Friday, May 25, 2012

'शिक्षा'!

माणूस आणि शिक्षा याचे किती  जवळ चे नाते असते, नाही का?

आपण लहान असताना शाळेत जात नाही म्हणून शिक्षा,
शाळेत गेल्या वर अभ्यास केला नाही म्हणून शिक्षा,
अभ्यास करूनही चांगले मार्क्स मिळाले नाहीत म्हणून शिक्षा,
तर शेजारच्या जोशी काकूच्या मुली सारखी badminton मध्ये 1st price मिळवले नाही म्हणून शिक्षा!

जसं जसं मोठे होत जातो, या शिक्षेच रूप बदलत जाते,
अभ्यास, मार्क्स, sports या छोट्या छोट्या गोष्टी मधून बाहेर येऊन
आपले आयुष्य आपल्या मोठ मोठे अनुभव आणि शिक्षा सुनावत जाते,

इथे प्रत्येकाच्या शिक्षेचा अनुभव वेगळा आणि त्यावर react होण्याची पद्धत ही . .

एखाद्यासाठी आपले सर्वस्व देऊन हि आपल्या पदरी काहीचं पडत नाही 
हे दुःख आणि ही शिक्षा मला सर्वात मोठी वाटते,
आपण आपल्याला शक्य होते ते सर्व काही करून ही,
पदरी आलेली निराशा जीवघेणी ठरत जाते,

आपला श्वास ही दुसऱ्याच्या नावा वर करून आपलाच जीव गुदमरतो,
ही वेदना त्या एवढ्याश्या मनाला, त्या जीवाला असह्य होते,
आणि मग आपण कुठे चुकलो, कुठे कमी पडलो,
या असल्या प्रश्नाच्या गुंत्यामध्ये आपले दुःखी मन अडकून राहते,

आपण सद्भावनेने काही करायला जातो, कधी काही सांगतो तर लपवतो,
कारण आपल्या साठी महत्वाचे असते ते म्हणजे समोरच्या व्यक्तीचे मन,
त्या जीवलगाच्या भावना, त्याचे होकार- नकार आणि त्याच्या इच्छा- आकांक्षा,

परंतु, आपण असे का केले, या मागचे कुठले ही कारण जाणून न घेता,
आपल्या पदरी फक्त वाईटपणा येतो,

अर्थातच, आपण गुन्हेगार म्हणून जाहीर केले जातो आणि मग  .. तो एकाकीपणा, तो अबोला, ते  आरोप.. आणि पुन्हा एकदा मिळते ती 'शिक्षा'!

- Manali Kulkarni 

Thursday, April 19, 2012

Reason, Season, or Lifetime


People come into your life for a reason, a season or a lifetime.
When you figure out which one it is,  you will know what to do for each person.

When someone is in your life for a REASON, it is usually to meet a need you have expressed.
They have come to assist you through a difficulty; to provide you with guidance and support;
to aid you physically, emotionally or spiritually.
 

They may seem like a godsend, and they are. They are there for the reason you need them to be.
Then, without any wrongdoing on your part or at an inconvenient time,
this person will say or do something to bring the relationship to an end.
Sometimes they die. Sometimes they walk away. Sometimes they act up and force you to take a stand.
What we must realize is that our need has been met, our desire fulfilled; their work is done.
The prayer you sent up has been answered and now it is time to move on.


Some people come into your life for a SEASON,
because your turn has come to share, grow or learn.
They bring you an experience of peace or make you laugh.
They may teach you something you have never done.
They usually give you an unbelievable amount of joy.
Believe it. It is real. But only for a season.


LIFETIME relationships teach you lifetime lessons;
things you must build upon in order to have a solid emotional foundation.
Your job is to accept the lesson, love the person,
and put what you have learned to use in all other relationships and areas of your life.
It is said that love is blind but friendship is clairvoyant

Thursday, March 8, 2012

Happy Women's Day!


आज सकाळी झोपेतून उठले तर जागतिक महिला दिनाच्या, ohh म्हणजे सोप्या भाषेत बोलायचे झाले तर 'Happy women's day' चा messages ची mobile मध्ये गर्दी झाली होती...

खर सांगायचे तर हे SMS, emails, social networking वर posting हे सगळे किती वरवरचे आहे न!  माझ्या आयुष्यात काय फरक पडलाय आज women's day आहे तर? मी रोज सारखीच ऑफिसला आलेय, same आयुष्य, same काम, सगळे तसेच जस काल होत! मग आज असं विशेष काय? मन प्रश्न विचारात राहिलंय की मना, आज तू  काय करणार?  काय वेगळे असं या दिवसाचे महत्व?

Women's day चा  विचार म्हंटला तर सुरवात झाली आई पासून! आई .. माझी आई... जिच्या शिवाय एक दिवस ही मी विचार करू शकत नाही अशी ती.. माझ्या आयुष्याची सुरवात तिच्या पासून, सगळे संस्कार, माझे चालणे बोलणे उठणे बसणे सगळे तिच्या मुळे, तिने शिकवले म्हणून.. तिचा संसारासाठीचा, नवऱ्या मुलाबाला साठीचा त्यागाला तोड नाही हे नक्कीच! देवा पेक्षाही मोठे स्थान तिचे.. मग आजचा या मोठ्या दिवशी तिला प्रणाम, तिच्या त्यागाचे, प्रेमाचे, कष्टाचे कौतुक करण्याचा हा दिवस! ती आम्हा सगळ्यासाठी किती महत्वाची आहे हे तिला सांगण्याचा हा दिवस!

पुढचा विचार माझ्या बहिणीचा, office मधल्या female colleagues, माझा सगळ्या मैत्रिणीचा! माझ्या  बरोबर काम करणाऱ्या, मला बर नसले तर  प्रेमाने विचारणाऱ्या, मी छान दिसत असेन तर complement देणाऱ्या, मी हसले तर माझ्या बरोबर हसणाऱ्या, मी रडले तर मला सहारा देणाऱ्या... आयुष्यातल्या सगळ्या उतार चढावा मध्ये माझा हात न सोडणाऱ्या, त्यांचा ही माझ्या आयुष्यात नक्कीच मोठा वाटा आहे .. आजचा दिवस त्यांचे ही आभार मानण्याचा .. त्याचा ही प्रेमाचा आदर करण्याचा !

स्त्री, कोणाची तरी मुलगी, बहिण, मैत्रीण, बायको, मग आई... किती ही नाती, किती माणसे आणि किती responsibilities .. घरातले संस्कार, सण-वार , सगळ्याचे उठणे बसणे, येणे जाणे, मुलांचा अभ्यास, नवऱ्या चे आयुष्य,
रोज चा स्वयंपाक... किती गोष्टी रोज चा रोज जपत असते ती.... स्वताचे आई  बाबा आणि परिवार सोडून नवऱ्याचा घरी जाऊन त्याच्या माणसांना आपलेसे करून घेण्याचे शौर्य, हिम्मत आणि धाडस फक्त एक स्त्रीच दाखवू शकते! तिच्या उरात देवाची देणगी आहे, खूप साऱ्या प्रेमाचा भांडार आहे..

कधी ती वाहणारी नदी तर कधी  एक कोमल फुलाची कळी, गार वाहणारा वारा तर कधी एक आल्हाददायी सुवास, आई बाबा चे एक निरागस स्वप्न, एका पुरुषाच्या आयुष्याची घट्ट बांधलेली गाठ, 9 महिने आपल्या बाळाला पोटात वाढवणारी अजब जादू तर
आपल्या नवऱ्याचे प्राण ही देवा कडून खेचून आणणारी शक्ती, माया-प्रेम-काळजी-सहनशिलते ची मूर्ती... सगळे तिचं...!

एक मुलगी, बहिण, मैत्रीण, बायको आणि
बाळाची आई बनून माझ्यातल्या स्त्रित्व पूर्ण करण्याची इच्छा असलेली मी एक.. Manali .. आजच्या दिवशी, या स्त्री शक्तीला माझा प्रणाम! 

- Manali Kulkarni 

Monday, February 27, 2012

गोळाबेरीज

आज सकाळी एका मित्राशी Gmail वर chat करत असताना,
त्याने सांगितले, आज मी आयुष्यातले एक मोठे धाडस करणार आहे 
मी विचारलं कसले धाडस, तर  म्हणाला,
आयुष्यात आज एका मुलीला मी propose करणार आहे!

बरोबर काम करता करता तिचा प्रेमात कधी पडलो,
हे माझे मलाही कळलच नाही,
आणि आज माझा मनातल्या भावना तिच्या समोर मांडायच्या,
कारण असं निशब्द राहण आता मला जमणार नाही,

त्याला खूप साऱ्या शुभेछा देऊन आमचे बोलणे संपले खरे,
पण मनात त्याने बोललेले एक वाक्य घर करून बसले होते,
तो  म्हणाला  होता ,
मरताना आयुष्य  जगल्याचे feel वायला हवं g,  
आयुष्यात मला याहून जास्त काहीही नकोय!

आयुष्य जगण्यासाठी रोज मरमर आपण करतो,
या धावपळी मध्ये स्वताचे सुख शोधात राहतो, 
पण किमान हे आयुष्य संपताना तरी एक समाधानाचे भाव
आपल्या चेहेऱ्यावर दिसावेत, ही अपेक्षा किंबहुना हा हट्ट ही जोपासतो,

असा विचार करता असताना मी स्वतालाच एक प्रश्न विचारला,
मना, आहेस का तू सुखी? मरताना येतील का तुझा चेहेऱ्यावर हे समाधानाचे भाव?

माझे मन मग दूर दूर पर्यंत आठवणी मध्ये विचार करत राहिले,
आज पर्यंत घडलेल्या सुख दुखाचे हिशोब मांडत बसले,
कधी केलेली मज्जा आठवून डोळ्यात आनंदाश्रू  उभे राहिले
तर कधी एखाद्या वाईट घडलेल्या गोष्टीने मन आजही दुखावले गेले,

वाईट गोष्टीचा हिशोब काढत असताना एक गम्मत माझा लक्षात आली,
माझा मनाप्रमाणे न झालेल्या गोष्टी या नकळतपणे वाईट झाल्या होत्या,
त्या चूक की बरोबर, झाले ते योग्य की अयोग्य असा काहीही विचार न करता,
त्या वाईट असं म्हणून माझा मनात दुखावलेल्या कोपऱ्या मध्ये साचून राहिल्या होत्या,

त्या सगळ्या गोष्टीचा हिशोब मांडताना,
माझा जीवनाची गोळाबेरीज काही केल्या सुटत नव्हती,
आयुष्यातले कुठले गणित कसे न का चुकले,
हे शोधत असताना माझा मेंदूनेही हार मानली होती,

आठवणीचा मागोवा घेत असताना आयुष्यात कुणा एकावर ,
मनापासून प्रेम केल्याचे पुरावे मला सापडले,
आणि मग चुकत असलेले सगळे हिशोब,
एक एक करून माझा नजरे समोर उभे राहू लागले,

मरताना माझा चेहेऱ्यावर समाधानाचे भाव नक्कीच असणार, 
हे सत्य आता माझा मनाने पक्के स्वीकारले आहे,
कारण आयुष्यात कुणा एका वर केलेले जीवापाड प्रेम 
मी मोकळ्या मनाने त्याच्या समोर खूप पूर्वीच मांडले आहे! 

Thursday, December 29, 2011

किंमत

एखाद्या व्यक्तीची खरी किंमत कळायची असेल,
तर त्या व्यक्तीने आपल्या पासून दूर गेलेचं पाहिजे का,
दिवसातला एक एक सेकंद मोजायला लागतो आपण,
मगच आपले खरे प्रेम आपल्या लक्षात येत का,

अगदी .. काल परवा पर्यंत मी ही तशी ठीकच होते,
आयुष्य येईल तसं जगायचे, या तत्वानुसार वागत होते,
सगळे काही आपली मनासारखे आहे, असा विश्वास जरा कुठे वाटायला लागला,
आणि ज्या व्यक्तीची आयुष्यात सर्वात जास्त सोबत होती, तोचं माझापासून दुरावला,

बरोबर असताना घालवलेले सगळे क्षण मग 
एक एक करून डोळ्यासमोर उभे राहू लागले,
आणि त्याचा आठवणी मध्ये गुरफटलेले माझे मन,
सैरभर त्याचा मागे धावू लागले,

त्या व्यक्तीची खरी किंमत कळायला मला त्याला गमवावे लागले,
आणि आयुष्यात नक्की मला काय हवंय, या प्रश्नाचे उत्तर आजही अनुत्तरीत राहिले,

माझ्या विचारामध्ये अशीच हरवून गेलेली असताना,
कोण कुठल्या फोन कॉल ने मला स्वप्नातून हलवले,
मी
पाहिले, मी पाहिले तर तो त्याचाच फोन होता,

आनंदाने वेडी पिशी होऊन मी फोन उचलला, 
पण नेमका त्याच वेळेस माझ्या शब्दाने माझा साथ सोडला,
संभाषणाची तशी गरज आम्हाला कधी पडलीच नव्हती,
कारण, एकमेकांचा अबोला ही ओळखण्याची जादू आमच्या नात्यात पहिल्या पासूनच होती,

एकमेकाशी काही ही न बोलता आम्ही एकमेकांना सर्व काही सांगितले,
त्या फोन वर एक शब्द ही न बोलता मी माझे सगळे मन त्याचा समोर उलगडले,
डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंना मात्र त्या वेळी सावरणे कठीण होते,
त्याच्या शिवाय मी कशी काय राहिले, हेच फक्त त्यातून व्यक्त होत होते,

माझे अश्रू आणि अबोल्याने त्याला माझी सगळी स्थिती सांगितली होती,
कारण, आज मला त्याचा असण्या आणि नसण्याची खरी किंमत कळून चुकली होती ...! 

Wednesday, December 28, 2011

शेवटची इच्छा

तू मला नेहेमी माझाचं म्हणून हवा असतोस,
आणि कायम माझा बरोबर हवाहवासा वाटतोस,
आपण बरोबर
असताना सगळे कसे संपूर्ण वाटते,
आणि तू समोर नसलास तरी सगळेच असून नसल्या सारखे जाणवते,

आयुष्य खूप सुंदर आहे, असा विश्वास तु बरोबर असताना मनात असतो,
आणि आपण दोघे ते अजून सुंदर करणार या तुझा वाक्याने तो अजूनच दृढ होतो,
तुझ्या बरोबर मी सगळ्यात सुखी आणि
सुरक्षित असते यात काही वादच नसतो,
आणि संकट आले तरी एकमेकांचा हात कधी ही सोडणार नाही, हा निर्धार मनात पक्का असतो,
 

तुझे हे प्रेम माझ्या साठी खूप मोठी देवाची देणगी आहे, 
आयुष्यात मला आता याहून मोठे काही मागायची इच्छा ही उरली नाहीये,
आपण असेचं एकमेका सोबत आयुष्य भर राहू,
आणि एकमेकांचा सुख दुखात एकमेकांचा आधार बनू,

तुझे आयुष्य माझे आयुष्य असा वेगळे काही मला वाटतच नाहीये,
कारण आपले सगळेच एकमेकांना देऊन आपल्यापाशी आता काही उरलच नाहीये,
आपले हे प्रेम
असेचं दिवसें दिवस वाढू दे,
एकमेकांसाठीची ही आपली तळमळ आयुष्यभर राहू दे..!

Saturday, December 24, 2011

आठवण

आज काल ना मी एकटी म्हणून कुठे थांबत नाही,
कारण मग आठवणी चा लपंडाव चालू होतो आणि मी त्यातून बाहेर येत नाही,

आपण नेहेमी एकत्र असायचो, आयुष्यातले सगळे सुख दुख एकमेका समोर मांडायचो,
तेव्हा असं वाटायचे आठवणी आठवणी म्हणजे नक्की असतात तरी काय, 
आपण बरोबर आहोतच ना, मग या आठवणी ची गरज तरी काय,

पण हळू हळू वेळेने आपले रंग दाखवले आणि, 
माझा मनातले एक एक गैर समज दूर होऊ लागले,

आपल्याला हवंय तसं नेहेमी घडेलच असा हट्ट आता मी करत नाही,
कारण आपण मागू तेच मिळेल असा आज काल आयुष्यात काही घडतच नाही,

तू असलास नसलास तरी ही तुझा बरोबर घालावेला वेळ माझाच असणार आहे,
जगात कोणी ही तुला माझा पासून हिरावले, तरी ही या आठवणी फक्त माझाच राहणार आहेत,

माझ्या संपत्ती चे मोजमाप जर कधी आठवणी मध्ये केले,
तर जगात माझ्या हून मोठा श्रीमंत शोधून ही सापडणार नाही,

मी तुझा आठवणी मध्ये खुश आहे,
कारण इथे तू फक्त माझा आणि मी, मी फक्त तुझी आहे..!

Monday, December 19, 2011

एवढे प्रेम कधी केलंय कोणी कोणा वर??

आज दिवस भर मनामध्ये फक्त एकचं विचार .. एवढे प्रेम कधी केलंय कोणी कोणा वर?? 

शांत बसले, डोळे मिटले, आणि एक एक गोष्ट आठवत गेले,
काय काय घडले मागच्या काही दिवस आणि महिन्या मध्ये, याचा नकळत हिशोब मांडत गेले .. 

मी काय केले, तू काय केलेस अशी मोठी यादी तयार झाली,
पण या सगळ्या गोष्टी मागे फक्त आणि फक्त प्रेम होते हि भावना माझा मनाला खूप सुखावून गेली .. 

मला काय हवंय काय नकोय, याचा विचार तू करतोस,
माझा छोट्यातल्या छोट्या सुखासाठी तू किती धडपडतोस,  
स्वताचे सर्वस्व पणाला लावून माझा वर इतके प्रेम करतोस,
तुला आणि त्या परमेश्वराला च ठाऊक कि हे सगळे कसं काय जमवतोस..

मी स्वताला किती नशीबवान समजते हे शब्दात नाही मी सांगू शकत,

पण पुन्हा पुन्हा स्वताला हाच प्रश्न विचारते कि 
एवढे प्रेम कधी केलंय कोणी कोणा वर?? 

एवढे प्रेम कधी केलंय कोणी कोणा वर?? 

Thursday, December 15, 2011

सुख दुखतंय...!!!

निवांत बसण्याच्या एखाद्या क्षणी मन उगाचच काहीतरी विचार करत राहतं. इच्छाही नसते खरंतर. पण त्या विचारांच्या स्पीडशी आपण मॅच नाही करू शकत स्वतःला.. फरफटत जात राहतो. एक वेगळंच युद्ध चालत राहतं आपलं. कुठल्या कुठल्या आठवणी सगळं सावरलेलं आवरलेलं उस्कटून विस्कटून टाकत दात विचकटत आपल्याभोवती पिंगा घालत राहतात..

आजच का व्हावं असं? बरं चाललंय की सगळं. घरी-दारी, शेजारी- पाजारी सगळं उत्तम आहे. हसरं घर आहे, जिवाचे जिवलग आहेत, मायेची माणसं आहेत... तरीसुद्धा ही टोचणी कशाची? अपूर्णतेची ही जाणीव का म्हणून? चला.. बास झालं.. एका वेळी ठरवून एकाच गोष्टीवर विचार करायचा... सतरा भुंगे एकत्र नकोत.. पण नाही.. माझा हट्टीपणा मनात आलाय की काय आज?? मी सांगितलेलं काहीच ऐकत नाहीये ते.. मी वेड्यासारखी हताश होतेय त्याचा हा चमत्कारिक अट्टाहास बघून...
काय बरं सांगत होते मी... पाहिलं, हे असं करतंय मन... आता इथे तर लगेच कुठे भलतीकडेच... किंवा गायबच अचानक... एखाद्या थंड शिखरावर वगैरे बसतंय जाऊन... ढोंगी... आगाऊ... आत्ता मी रडवेली झाले न, की मग त्याचा जीव भांड्यात पडेल... काय करणार आपण तरी.. स्वभाव असतो एकेकाचा.. 

स्वभाव??? कोणाचा स्वभाव?? मनाचा??? माझ्या मनाचा?? म्हणजे माझाच न?? नाही पण.. मी कुठे असं वागते? मला नाही आवडत कोणाला उगीचच रडवायला!! मग कोणाचा स्वभाव आहे हा?? आणि तो माझ्या मनाचा कसा झाला?? कुठून आला तो त्याच्यापाशी? म्हणजे माझं मन मला न सांगता असं एकटच फिरायला जातं?? भरकटत भरकटत भलभलत्या माणसांना भेटतं; आणि मग त्यांचे स्वभाव घेऊन येतं??
एक एक एक मिनिट.. मला नक्की वाईट कशाचं वाटत होतं?? पुन्हा विसरले मी... मळभ आलं होतं म्हणून?... हं.. आठवतंय थोडं थोडं.. गळ्यापर्यंत काहीतरी आलंय, श्वास अडकेल की काय असं वाटतंय.. आपलं सगळं चुकतंय.. वागणं चुकतंय.. दिसणं चुकतंय, हसणं चुकतंय, बसणं चुकतंय.. कदाचित, कदाचित असणंचचुकतंय.. पुन्हा एक उसासा!!! एक अश्रू सुद्धा.. आतून खराखुरा उमाळा येतोय... काय करावं?? कधी कधी स्वतःच स्वतःची समजूत नाही काढू शकत.. पुरे नाही पडू शकत आपण..

तेवढ्यात बाजूचा फोन वाजतो.. ओळखीचं एखादं नाव स्क्रीन वर फ्लॅश होतं.. रडता रडता आपल्याच नकळत हसतो आपण.. तो एकच आवाज ऐकून इतका वेळ भयभय करणारं येडपट मन शांत होतं एकदम.. मळभ दूर जातं जातं...आणि पाऊस कोसळायला लागतो, झिम्माड... 

आपले उमाळे, उसासे समजून घेत फोनवरचा तो आवाज गालातल्या गालात हसतो हलकेच...आणि हळुवारपणे म्हणतो...... "काही नाही... तुझ सुख दुखतंय...!!! 

- अनामिक 

Thursday, December 1, 2011

असं का होतं.....

असं का होतं, कि मी प्रत्येक गोष्टीं मध्ये तुझे रूप पाहतो,
असं का होतं कि प्रत्येक गोष्ट पाह्लील्या वर मला  ती अपूर्ण वाटते,
असं का होतं कि त्या सगळ्या गोष्टींचा पूर्णत्व मी तुझ्या शोधात असतो,
असं का होतं कि तुझ्याशी बोलल्या शिवाय श्वास घ्यायची इच्छा होत नाही?
तू रागाव, तू चीड, पण माझ्याशी बोल, अशीच माझी नेहमी का भावना असते?
प्रेम आहे हे मान्य पण, असे का होतं कि आपण जेव्हा केव्हा भेटतो  आपल्या प्रेमाला मर्यादाच राहत नाही?
आयुष्यात तर भरपूर लोक प्रेम करतात, पण आपल्या प्रेमातला हा निराळा गोडवा कसा काय?

हे सगळे प्रश्न मी जेव्हा माझा मनाला विचारले तेव्हा माझे मन हसून म्हणाले अरे प्रेमात तर सगळेच पडतात,  त्यातून काही तरतात तर काही सावरतात..
तुमच्या बाबतीत जी गोष्ट होतीये ना  ती  म्हणजे तुम्ही तुमच्या सर्वस्व पणाची आहुती देताय आणि मग आपल्या कडे काहीच  नाही उरला म्हणून रडत बसताय,
फक्त एकाच आशेने कि या आहुती ने एक सुंदर पदार्थ व्हावा, आणि त्या पदार्थाने बाकी सगळ्यांचे मन भरावे,  या सगळ्या आहुती देऊन पण त्याच वेळी त्या आहुतीला एका निर्यान्तक तापमानाला भाजता.. या भाजण्याने खूप चटके बसतात.. खूप त्रास ही होतो ..
कदाचित आज खूप त्रास होतं ही असेल, पण ह्या सगळ्या गोष्टीत्ना बनणारा पदार्थ खूप छान, आणि अमृताहूनही गोड असणार आहे ..

एवढे सगळा आहे, तरी कुठे तरी माझे मन अजूनही जेव्हा तुझा विचार करते, तेव्हा हाच प्रश्न विचारतो कि असं का होतं ...

Thursday, November 3, 2011

मला अजून हि नाही समजले की हे प्रेम काय असते?

कोणी तरी सांगितले होते  की प्रेम फार गोड असते,
पण मला अजून हि नाही समजले की हे प्रेम  काय असते?

नेहेमी तिच्या बद्दल विचार करणं म्हणजे प्रेम असते,
कि प्रत्येक विचारात ती असणे म्हणजे प्रेम असते?

ती बरोबर असावी असं वाटणे प्रेम असते,
की दूर असूनही ती जवळ भासणे हे प्रेम असते?
मला अजून हि नाही समजले की हे प्रेम  काय असते? 

तिच्या दुखात तिच्या बरोबर असणे म्हणजे प्रेम असते,
की तिच्या सुखात हि तिच्या पासून दूर जाणे प्रेम असते?
मला अजून हि नाही समजले की हे प्रेम  काय असते?

आपल्या सुखासाठी कोणाचा चं विचार न करणे म्हणजे प्रेम असते,
 की दुसऱ्याच्या सुखासाठी एकमेका पासून दूर जाणे म्हणजे प्रेम असते?

कारण, मला अजून हि नाही समजले की हे प्रेम  काय असते?


 - माझ्या खूप जवळ चा मित्रा ने माझा वर केलेली एक अतिशय सुंदर कविता



Thursday, September 22, 2011

आजची चांगली गोष्ट !

रोजच्या जीवनात बरेच वेळा असं वाटतं की आपल्या मनासारखं काहीच होत नाही. होतील असं वाटणारी कामं ठप्प पडतात, अडकतात. कितीही प्रयत्न केले तरी ज्या गोष्टी व्हायच्या असतात त्या होत नाहीत. मग निराशा येते, राग येतो आणि आपली खूप चिडचिड होते. आपण रागावलो की तो राग मित्रांवर किंवा घरच्यांवर काढला जातो. मग राग गेला की आपल्याला वाईट वाटतं, आपण त्यांची क्षमा मागतो आणि ते आपल्याला माफही करतात. पण बोललेले शब्द परत घेता येत नाहीत. आपण ज्या कारणामुळे चिडलो होतो ती गोष्ट शुल्लक वाटू लागते.

असं झालं की मला एक गोष्ट आठवते. एक माणूस देवाचे आभार मानत असतो. तो म्हणत असतो की "माझ्याकडे नवे बूट नव्हते म्हणून मी दु:खी होतो त्या वेळी तू मला एक माणूस दाखवलास ज्याच्याकडे पाय पण नव्हते. मग माझी तकरार आपोआप मुकी झाली." थोडक्यात सांगायचं तर आपण छोट्या दु:खांकडे लक्ष देऊन त्यांना मोठं करतो पण छोट्या सुखांकडे लक्षच देत नाही. जसं बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहिजे तशा होत नाहीत, तसं त्याहून कितीतरी जास्त गोष्टी आपल्याला खुश करायचा प्रयत्न करत असतात. पण आपल्या एक लहानशा दु:खाच्या नादात आपण त्या दहा खुश करणाऱ्या गोष्टींना विसरतो.

जर आतापर्यंतचे विचार पटले असतील, तर मनात एक प्रश्न पण आला असेल. आपण या लहान सुखांकडे लक्ष कसं द्यावं? काही मनासारखं नाही झालं तर त्याला पटकन मनातून बाहेर काढून जे आपल्याला सुख देतं ते कसं करावं? याचं उत्तर माझ्या एका मैत्रिणींकडून मला शिकायला मिळालं. आमची मैत्री जशी वाढू लागली तसं त्यांनी मला एक मजा सांगितली. त्या म्हणाल्या की आम्ही एकामेकांशी बोलायला लागलो की 'आजची चांगली गोष्ट काय?' असा प्रश्न विचारायचा. प्रश्न सोपा आहे पण पहिले काही दिवस मला नीट उत्तरंच देता येत नव्हतं. मी 'आजची चांगली गोष्ट काही नाही' आसं म्हटलं की त्या 'काहीतरी असेल, नीट विचार कर' असं म्हणायच्या. मग मी काहीतरी छोट्यातलं छोटं छान आहे म्हणून सांगायचो. त्या पण साध्या सोप्या गोष्टी 'आजची चांगली गोष्ट' म्हणून सांगायच्या.

पण काही दिवस हा प्रकार सुरू राहिला आणि मला लहानातल्या लहान गोष्टी पण 'आजची चांगली गोष्ट' वाटू लागल्या. आज एका दुकानात मस्त कॉफी प्यायली, आज मस्त आठ तास गजर न लावता झोप झाली, आज अचानक एक जुना मित्र भेटला अशी आमची उत्तरं येऊ लागली. मग त्यांच्या प्रश्नाचा खरा अर्थ लक्षात आला. जसं आपण लहान दु:खांकडे लक्ष देतो तसं या प्रश्नामुळे आम्ही लहान सुखांकडे लक्ष देत होतो आणि कोणालातरी सांगितलं की ते सुख परत मनात यायचं. मग 'आजची चांगली गोष्ट'च्या ऐवजी 'आजच्या चांगल्या गोष्टी' अशा वाढू लागल्या. खरंच दिवसातल्या वाईट गोष्टी या चांगल्या गोष्टींसमोर शुल्लक वाटू लागल्या. आता तर मी स्वत:ला हा प्रश्न रोज झोपायच्या आधी विचारतो. गेलेला दिवस संपवताना त्यांतली एकतरी चांगली आठवण परत जगली पाहिजे. अशा छोट्या सुखांकडे नीट लक्ष दिलं तर एक एक करून सगळेच दिवस मजेत जाऊ लागतात.

तुम्ही पण हा प्रयोग करून बघा. जसं आपण बंद असलेल्या मंदिरासमोरून जाताना पण 'आत देव आहे' या विश्वासाने नमस्कार करतो, तसं या प्रयोगावर पण विश्वास करून बघा. अट फक्त एकच, की तुम्ही 'आजची चांगली गोष्ट काय?' या प्रश्नाला काहीतरी उत्तर दिलंच पाहिजे. हा प्रश्न स्वत:ला तर विचाराच, पण आपल्या मित्रांना किंवा घरातल्या व्यक्तिंना विचारा. उत्तर कितीही शुल्लक वाटलं तरी नीट ऐका, तुमचं उत्तर पण सांगा. बघा तुम्हाला पण मस्त वाटेल आणि तुमच्या मित्रांना पण. हा प्रश्न खूप बाळबोध वाटतो, किंवा मित्र चेष्टा करतील असं वाटत असेल तर आधी काही दिवस स्वत:लाच विचारा. मग एकदा तुम्ही रोजच्या दिवसाचा आस्वाद घेऊ लागलात की मित्रांना विचारा 'आजची चांगली गोष्ट काय?'

आता शेवटी मी मला आवडणाऱ्या काही साध्या-सोप्या गोष्टी लिहीतो. खाण्यावरून सुरूवात केली तर तेलकट तरी आणि तिखट मिसळ, आईस-क्रिम, उन्हात फिरून आल्यावर उसाचा रस, पुण्यातली सुजाताची मस्तानी, पाऊस पडत असताना गरम गरम भजी, रात्री झोपायच्या आधी एक छोटं चॉकलेट, आईच्या हातचं जेवण, हापूस आंबा असे असंख्य पदार्थ आहेत. हे रोज एक एक करून खायचं असं ठरवलं तरी वर्षाच्या 'चांगल्या गोष्टींची' यादी होईल. रेडिओ वर अचानक लागलेलं आपल्याला आवडणारं गाणं, हे पण एक वेगळंच सुख आहे. त्यात ते गाणं थोडं जुनं असेल आणि आपल्याला त्याचा विसर पडत असताना ते लागलं तर मग अजूनच मस्त वाटतं. पहिल्या पावसानंतर ओल्या मातीचा सुगंध पण हृदयात सुकलेल्या भरपूर आठवणी परत ओल्या करून जातो. आपण नवी साडी किंवा नवा शर्ट घातला की होणारी प्रशंसा हे पण एक छोटंसं सुखच आहे. अंघोळ करून स्वच्छ झाल्यावर अंगावर मारलेलं अत्तर, आपल्याला दिवसभर त्याच्या सुगंधाने ताजंतवानं ठेऊ शकतं. अशा कितीतरी लहान वाटणाऱ्या गोष्टी आपल्याला खूप आनंद देऊ शकतात, जर आपण त्यांना आनंद द्यायची संधी दिली तर

Tuesday, September 20, 2011

People

Sometimes people come into your life & you know right away that they were meant to be there, to serve some sort of purpose, teach you a lesson, or help you figure out who you are & or who you want to become You never know who these people may be (possibly your roommate, neighbor, professor, long lost friend, lover, or even a complete stranger), but when you lock eyes with them, you know at the very moment that they will affect your life in some profound way.
and sometime things will happen to you that may seem horrible, painful, & unfair at first, but in reflection you find that without overcoming these obstacles that you would have never realized your true potential, strength, will power, or heart
Everything happens for a reason. Nothing happens by chance or by mean of good luck. Illness, injury, love, lost moments of true greatness & sheer stupidity all occur to test the limits of your soul. Without this small test, whatever they may be, life would be like a smoothly paved, straight, flat road to nowhere. It would be safe & comfortable, but dull and utterly pointless.

The people that you meet who affect your life, and the success and downfalls you experience, help to create who you are and who you will become Even the bad experiences are learned from. In fact, they are the most poignant ones.
If someone hurts you, betrays you, or breaks your heart, forgive them for they have helped you learn about trust and the importance of being cautious when you open your heart. If someone loves you, love them back unconditionally, not only because they love you, but because in a way, they are teaching you to love & how to open your heart & eyes to things.

Make everyday count. Appreciate every moment & take from those moments everything you could possibly can for you may never be able to experience it again. Talk to people that you have never talked to before & actually listen... Let yourself fall in love again, break free, and set your sights high. Hold your head up because you have every right too.

Tell yourself that you are a great individual & believe in yourself. For if you don't believe in yourself, it will be hard for others to believe in you. You can make your life anything you wish.....Create your own life & then go out & live it with absolutely NO REGRETS. Most importantly, if you love someone tell him or her, for you NEVER know what tomorrow may have in store. And learn a lesson in life each day you live.

Today is the tomorrow you were worried about yesterday.... Was it worth it?

Tuesday, August 2, 2011

का बरे मी प्रेमात पडले, असा प्रश्नच मुळी मला पडत नाही,
तू असलास काय, नसलास काय, माझं काहीच अडत नाही

समोर असलास की डोळे भरून बघून घेते तुला,
नसलास
की तुझ्या आठवणीत जगून घेते तुला,
असण्या-नसण्याच्या सीमांच्या व्याख्येत माझं प्रेमच बसत नाही,
तू असलास काय, नसलास काय, माझं काहीच अडत नाही

आजही रोज संध्याकाळी नकळत तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसते,
कधीतर चक्क आपल्या नेहमीच्या ठिकाणीही जाऊन बसते,
माझ्या वागण्याचे कधी मलाच संदर्भ लागत नाहीत,
तू असलास काय, नसलास काय, माझं काहीच अडत नाही

तू येणार नाहीस हे माहीत असतं मला, तरीही वाटतं,
येशीलच ऐकून माझी अधीर साद...
चंद्र-चांदण्यांतही असतील ना रे काही वाद,
पण तरीही चंद्र आकाशात आला, की चांदणंही आल्याशिवाय राहत नाही,
तू असलास काय, नसलास काय, माझं काहीच अडत नाही

शिकलेय मी आता तुझ्यावाचून जगणं,
तुझ्या भासांच्या जाळ्यात स्वतःला गुरफटून टाकणं,
आता कधी मला तुझं नसणं सलत नाही,
कारण तेव्हा जणु माझीचं मी उरत नाही,

का बरे मी प्रेमात पडले, असा प्रश्नच मुळी मला पडत नाही,
तू असलास काय, नसलास काय, माझं काहीच अडत नाही

Thursday, July 28, 2011

Testing for gossip


In ancient Greece, Socrates was reputed to hold knowledge in high esteem. One day an acquaintance met the great philosopher and said, “Do you know what I just heard about your friend?”

“Hold on a minute,” Socrates replied. “Before telling me anything I’d like you to pass a little test. It’s called the Triple Filter Test.”

“Triple filter?”

“That’s right,” Socrates continued. “Before you talk to me about my friend, it might be a good idea to take a moment and filter what you’re going to say. That’s why I call it the triple filter test. The first filter is Truth. Have you made absolutely sure that what you are about to tell me is true?”

“No,” the man said, “Actually I just heard about it and ...”

“All right,” said Socrates. “So you don’t really know if it’s true or not. Now let’s try the second filter, the filter of Goodness. Is what you are about to tell me about my friend something good?”

“No, on the contrary…”

“So,” Socrates continued, “you want to tell me something bad about him, but you’re not certain it’s true. You may still pass the test though, because there’s one filter left: the filter of Usefulness. Is what you want to tell me about my friend going to be useful to me?”

“No, not really …”

“Well,” concluded Socrates, “if what you want to tell me is neither true nor good nor even useful, why tell it to me at all?”

Saturday, July 23, 2011

मी

तुझ्यावर कविता लिहिणं तसं अवघडच
सगळच लिहून झालय कारण,
फुलं, वारा, डोंगर, दर्‍या, चांदण्या, चंद्र,
रान, पहाट, लाटा, नदी, पाऊस, वीज....
सगळच
मग मी वेगळं असं काय लिहिणार?
तरीही मी तुझ्यावर लिहितो-
मला आठवतय,
तुझ्यावरल्या गेल्या कवितेमुळे
माझे शब्द, शब्दांच्या प्रेमात पडले होते!
आता मला जमेलच कविता असं नाही
पण लिहिताना इतकच ठावूक
की उद्या सकाळी माझा सोनचाफा
पिवळाधम्म होऊन बहरला असेल,
मी तुझ्यावर कविता लिहिताना
सोनचाफ्याला पाणी घालत होतो!

-
प्रथमेश पाठक (माझा कवी मित्र)
ज्याने ही कविता माझा वर लिहिली आहे ... अप्रतिम !!!

Thursday, July 21, 2011

आठवण

आज अचानक तुझी आठवण आली.. खूप दिवसांनी
इतके दिवस स्वत:ला तुझ्यापासून, तुझ्या आठवणींपासून दुर नेत होते.
कारण..

तुझी फ़क्त एक आठवण आली की, काय काय होतं माहितीये
मी बराच वेळ तुझ्या आठवणींमध्ये रमून जाते..
मग उगाचच काहीतरी सुचायला लागतं,
केवळ ते तुझ्यामुळं सुचतयं म्हणून मग मी लिहीत जाते..
मग दोन... तीन... चार.... अशी वाक्याला वाक्यं जुळून येतात,
प्रत्येक वाक्यात पाच-सहा शब्द, तेही तुझेच .. मागे-पुढे रेलून बसतात.
शब्दांमधली अक्षरं गालातल्या गालात हसत राहतात.
मग उगाचच कुठेतरी स्वल्पविराम टाकते.
जिथे शब्द जास्तच धीटपणे बोलतायेत वाटलं की पुर्णविराम.
आणि हे कल्पनेतलं वाटावं म्हणून मग उद्गारवाचक चिन्हं लावते दोन चार
अस करत करत मग पान भरून काहीतरी तयार होतं.

मग त्याला 'कविता' म्हणून नाव देत मी मोकळी होते, मग ती दोन तीन मित्र मैत्रिणी ना पाठवते,
कुणी छान म्हणतं.... कुणी फ़क्त हसतं....
पण या सगळ्यापासून अनभिद्न्य तू कुठेतरी दूर दूर असतोस
तुला या सगळ्याशी काहीही देण घेणं नसतं

आणि मला मला मात्र ती कविता वाचून पुन्हा तुझीच आठवण येते ...
आणि तुझी आठवण आली की...

काय काय होतं माहितीये..
मी बराच वेळ तुझ्या आठवणींमध्ये रमून जाते
मग उगाचच काहीतरी सुचायला लागतं.....

- अनामिक

Tuesday, July 19, 2011

जमाखर्च

आज कित्ती कित्ती वर्षांनी एक गांडूळ कागदावर उचलून बाहेर टाकलं, अन् असंच विचारात पडलो...

गेल्या कितीक वर्षात पापडाच्या बोट्या खाल्ल्या नाहीत, आखीव ताव विकत आणले नाहीत, मुंगीकडे निरखून पाहिलं नाही. पेनात शाई भरली नाही. गाण्याच्या भेंड्या खेळल्या नाहीत. आवाज आल्यावर डोक्यावरच विमान दिसेनासं होईपर्यंत अगदी मान दुखेपर्यंत पाहिलं नाही. कॉईन बॉक्स वरून फोन केला नाही. फटाक्याची माळ सुट्टी करून पेटवली नाही. चुलीवर पाणी तापवलं नाही. अंगणातलं गवत काढलं नाही. चप्पल तुटल्यावर लंगडत जाऊन शिवून घेतली नाही. नाटकाचे पडदे रंगवले नाहीत. चॉकलेटचा सोनेरी कागद सरळ चपटा केला नाही. रस्त्यावरचं प्लास्टीकचं डबड पायानं लाथाडत चाललो नाही.....

आता या सगळ्या गोष्टीत काही अवर्णनीय आनंद होता आणि हे सगळं करत नाहीये म्हणजे आयुष्य खूप निरस, केवीलवाण चाललंय असही नाही.

मी रूढार्थाने नोस्टॅल्जिक वगैरे होणाऱ्यातलाही नाही. पण तरीही नकळत जमाखर्च मांडला जातोच ना .

काळानं जे आणि जेवढं दोन्ही हातांनी ओरबाडून नेलंय तितकं खरंच परत दिलंय का? मुठभर तरी ....

Disclaimer: This is not my work. But I have read this and thought of sharing it with you.

Thursday, July 14, 2011

प्रिय मुंबईस --

प्रिय मुंबईस,

आज तुला पत्र लिहिताना हात थरथरतोय. डोळ्याच्या कडा पानावल्यात. आत्ताच तुझ्यावर झालेल्या अत्याचाराची न्यूज़ TV वर पहिली. पुन्हा एकदा bomb blasts !! निष्पापांचे मृतदेह, बाप गमावून निराधार झालेली अनाथ मूल, तुझ्या रस्त्यावर सांडलेल ते हतबल रक्त पाहून तळपायाची आग मस्तकाला गेली ग.... काही दिवसांपूर्वी आमच्या पुण्याला झालेल्या जखमेची आठवण पुन्हा ताजी झाली. किती उपकार आहेत ग तुझे आमच्यावर हे शब्दात मांड़ण केवळ अशक्य.. आर्थिक राजधानीचा थाट तुझा... कित्येक बेरोजगाराना मायेची भाकरी दिलीस तू.. कित्येक बेघराना आधार दिलास.. तुझी गती पाहून आम्ही अवाक होतो.. परदेशातही 'I am from India' अस आम्ही सांगितल्यावर 'ohh India? then are you from Mumbai?' ह्या प्रतिप्रश्नावर मुंबईकर नसूनही आमची छाती तुझ नाव ऐकून अभिमानाने फुगते.. सारख इश्वर चरनी प्रार्थना करतो की हिला कुणाची नजर लागू नये.. पण नेमक हेच घडत.. जे आज घडल ते... पुन्हा एकदा तुझा बलात्कार झाला..
कधी संपणार हे सगळ हा भ्याड प्रश्न एकमेकाना विचारून चादरी डोक्यावर घेवून आज आम्ही झोपी जावू... पाउस तसा चालूच आहे तेव्हा तुझ्या रस्त्यावर सांडलेल रक्त पुन्हा एकदा काही क्षणात वाहून जाईल... आता नाही सहन होत ग हे सगळ.. बंदुका हातात घेवून तुझ्या अपराध्यांच्या डोक्यात गोळ्या घालाव्याश्या वाटतात पण अपराधी तरी कोण ग.. आम्हीच.. होय आम्हीच... स्वराज्यासाठी ज्या भूमीवर शिवरायानी शत्रुचा कोतळा बाहेर काढला त्याच भूमीवर आम्ही स्वाभिमान आमच्याच छातीत कुजवत ठेवत जगतोय... नुसत एकमेकाना दोषी ठरवून षंढत्वाच जीवन जगतोय.. खर तर आमच्यापेक्षा ते षंढ सुद्धा बरे.. निदान टाळ्या वाजवून स्वताहाच पोट तरी भरत आहेत.. आम्ही मात्र पदोपदी तुझा बलात्कार निष्क्रियतेने पाहतोय.. मेनबत्त्या पेटवून मेलेल्यांना श्रद्धांजली वाहून राजकारन्याना शिव्या देतोय.. पण हे भड़वे नेते तरी कोण ग.. आमच्याच निष्क्रिय तेचे, आमच्याच भ्याडपनाचे निर्जीव पुतळॆ.. स्त्रीच्या अब्रुच्या रक्षनासाठी छातीची ढाल बनवनारी ती मर्दांची जात कुठे हरवली माहीत नाही ग.. ज्या भूमी मध्ये अखंड महाराष्ट्रासाठी मराठी माणसाने रक्ताचे पाट वाहिले त्याच भुमीमध्ये काही दिड दमडीचे हिजड़े निश्पापाना मारत आहेत आणि आम्ही काय करतोय?? तर निषेध नोंदवतोय.... तुझ्या चरणी हा माथा टेकवून तुझी माफी मागतो आज.. शक्य असेल तर माफ़ कर आम्हाला.. आम्हीच तुझे अपराधी आहोत.. माफ़ कर माते, आम्हाला माफ़ कर !!!


- तुझा अपराधी

Originally written by,
Onkar Walavalkar (A friend and a beautiful writer)

Wednesday, July 13, 2011

आजची अर्धांगिनी आणि तिच्या अपेक्षा

* हे वास्तवही लक्षात घे...

'बायको नोकरी करणारी असावी, ती स्मार्ट असावी, चारचौघींत उठून दिसावी' अशी तमाम नवरेमंडळींची इच्छा असते. यासोबत तिने 'गृहकृत्यदक्ष' आणि 'आदर्श सून' असणंही मस्ट असतं. पण, तीही आपल्यासारखी एक माणूस आहे. तिच्या भावभावना, इच्छा-आकांक्षा, तिची परिस्थिती कशी असू शकते, याकडे मात्र या नवरेलोकांचं दुर्लक्ष होतं. नवऱ्याचा बायकोकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा, त्याबद्दल
चा हा एक प्रयत्न ...

- उद्या कदाचित तुझं नोकरी करणाऱ्या मुलीशी लग्न होईल. त्यावेळी जरा हे वास्तवही लक्षात घे.
- ती तुझ्याएवढीच शिकलेली असेल. तुझ्याएवढाच पगार कमावत असेल.
- तीदेखील तुझ्यासारखीच व्यक्ती असेल, त्यामुळे तिचीही स्वप्नं असतील, आवडी असतील,
- तिनेही आतापर्यंत कधीच किचनमध्ये पाऊल टाकलं नसेल, अगदी तुझ्यासारखंच किंवा तुझ्या बहिणीसारखं...
- तीसुद्धा अभ्यासात बिझी असेल आणि मुलगी म्हणून कसलीही सवलत न देणाऱ्या या स्पधेर्च्या युगात पुढे जाण्यासाठी धडपडत असेल, अगदी तुझ्यासारखीच!
- तिनेही तुझ्याप्रमाणेच वयाची २०-२५ वर्षं आई, बाबा, बहीण, भाऊ यांच्या प्रेमाच्या सान्निध्यात घालवली असतील,
- आणि तरीही हे सारं मागे सोडून, तिचं घर, प्रेमाची माणसं यांना दूर करून ती तुझं घरं, तुझं कुटुंब, तुमच्या रितीभाती स्वीकारायला आली असेल.
- पहिल्याच दिवशी तिने मास्टर शेफप्रमाणे स्वयंपाक करावा अशी सगळ्यांची अपेक्षा असेल,
- नेहमीच्या बेडवर तुम्ही डाराडूर झोपलेले असताना ती मात्र सर्वस्वी अनोळख्या असलेल्या वातावरणाशी, अनुभवांशी आणि किचनशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असेल.
- सकाळी उठल्याबरोबर तिने चहाचा कप हातात द्यावा आणि रात्रीचं जेवणही तिच्याच हातचं असावं अशी अपेक्षा असेल,
- तिलाही ऑफिसच्या कामाच्या डेडलाइन पाळताना उशीर होत असेल,
- तीसुद्धा कंटाळली असेल, कदाचित तुमच्यापेक्षा थोडी जास्तच, तरीही तिने तक्रारीचा सूर लावू नये असंच तुम्ही म्हणाल.
- नोकर, स्वयंपाकी, बायको... यापैकी तिला एखादी भूमिका करायची नसली तरीही...
- आणि त्यातही तुमच्या तिच्याकडून काय अपेक्षा आहेत हेदेखील शिकण्याचा ती प्रयत्न करत राहील...
- तीसुद्धा थकते, कंटाळते...
- पण सतत टुमणं लावू नये आणि तुझ्यापेक्षा पुढे जाऊ नये या अपेक्षाही तिला माहिती असतात.
- तिचा स्वत:चा कंपू असतो, त्यात मित्रंही असतात आणि तिच्या ऑफिसमधले पुरुष सहकारीही... तरीही ईर्ष्या, अनावश्यक स्पर्धा आणि असुरक्षिततेच्या भावनेने तुमच्या मनात घर करू नये म्हणून ती बालमित्रांपासूनही दूर राहते.
- कदाचित तिलाही लेट नाइट पाटीर्त जायला, धमाल करायला आवडत असेल, पण तुम्हाला आवडणार नाही म्हणून तू सांगितलेलं नसतानाही ती तसं करत नाही.
- स्वत:कडून पूर्ण प्रयत्न करून ती हे नातं सुंदर करेल. तू मदत केली आणि विश्वास ठेवला तर हे नातं जीवनातलं सर्वाधिक यशस्वी शिखर गाठू शकेल.
- या अनोळखी घरात केवळ तू एकच तिच्या ओळखीचा, जवळचा आहेस, त्यामुळे तुझी मदत, संवेदना आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे अण्डरस्टॅण्डिंग आणि प्रेम मिळावं, अशी तिची अपेक्षा असेल.

पण अनेक जण हे समजूनच घेत नाहीत...

About Me

My photo
Nasik-Pune-Mumbai, Maharashtra, India
HR at profession, scorpion, independent, cricket fan, BB lover, dancer, tea addict, shopping freak, talkative..!