तुझ्यावर कविता लिहिणं तसं अवघडच
सगळच लिहून झालय कारण,
फुलं, वारा, डोंगर, दर्या, चांदण्या, चंद्र,
रान, पहाट, लाटा, नदी, पाऊस, वीज....
सगळच
मग मी वेगळं असं काय लिहिणार?
तरीही मी तुझ्यावर लिहितो-
मला आठवतय,
तुझ्यावरल्या गेल्या कवितेमुळे
माझे शब्द, शब्दांच्या प्रेमात पडले होते!
आता मला जमेलच कविता असं नाही
पण लिहिताना इतकच ठावूक
की उद्या सकाळी माझा सोनचाफा
पिवळाधम्म होऊन बहरला असेल,
मी तुझ्यावर कविता लिहिताना
सोनचाफ्याला पाणी घालत होतो!
- प्रथमेश पाठक (माझा कवी मित्र)
ज्याने ही कविता माझा वर लिहिली आहे ... अप्रतिम !!!

No comments:
Post a Comment