आज सकाळी झोपेतून उठले तर जागतिक महिला दिनाच्या, ohh म्हणजे सोप्या भाषेत बोलायचे झाले तर 'Happy women's day' चा messages ची mobile मध्ये गर्दी झाली होती...
खर सांगायचे तर हे SMS, emails, social networking वर posting हे सगळे किती वरवरचे आहे न! माझ्या आयुष्यात काय फरक पडलाय आज women's day आहे तर? मी रोज सारखीच ऑफिसला आलेय, same आयुष्य, same काम, सगळे तसेच जस काल होत! मग आज असं विशेष काय? मन प्रश्न विचारात राहिलंय की मना, आज तू काय करणार? काय वेगळे असं या दिवसाचे महत्व?
Women's day चा विचार म्हंटला तर सुरवात झाली आई पासून! आई .. माझी आई... जिच्या शिवाय एक दिवस ही मी विचार करू शकत नाही अशी ती.. माझ्या आयुष्याची सुरवात तिच्या पासून, सगळे संस्कार, माझे चालणे बोलणे उठणे बसणे सगळे तिच्या मुळे, तिने शिकवले म्हणून.. तिचा संसारासाठीचा, नवऱ्या मुलाबाला साठीचा त्यागाला तोड नाही हे नक्कीच! देवा पेक्षाही मोठे स्थान तिचे.. मग आजचा या मोठ्या दिवशी तिला प्रणाम, तिच्या त्यागाचे, प्रेमाचे, कष्टाचे कौतुक करण्याचा हा दिवस! ती आम्हा सगळ्यासाठी किती महत्वाची आहे हे तिला सांगण्याचा हा दिवस!
पुढचा विचार माझ्या बहिणीचा, office मधल्या female colleagues, माझा सगळ्या मैत्रिणीचा! माझ्या बरोबर काम करणाऱ्या, मला बर नसले तर प्रेमाने विचारणाऱ्या, मी छान दिसत असेन तर complement देणाऱ्या, मी हसले तर माझ्या बरोबर हसणाऱ्या, मी रडले तर मला सहारा देणाऱ्या... आयुष्यातल्या सगळ्या उतार चढावा मध्ये माझा हात न सोडणाऱ्या, त्यांचा ही माझ्या आयुष्यात नक्कीच मोठा वाटा आहे .. आजचा दिवस त्यांचे ही आभार मानण्याचा .. त्याचा ही प्रेमाचा आदर करण्याचा !
स्त्री, कोणाची तरी मुलगी, बहिण, मैत्रीण, बायको, मग आई... किती ही नाती, किती माणसे आणि किती responsibilities .. घरातले संस्कार, सण-वार , सगळ्याचे उठणे बसणे, येणे जाणे, मुलांचा अभ्यास, नवऱ्या चे आयुष्य, रोज चा स्वयंपाक... किती गोष्टी रोज चा रोज जपत असते ती.... स्वताचे आई बाबा आणि परिवार सोडून नवऱ्याचा घरी जाऊन त्याच्या माणसांना आपलेसे करून घेण्याचे शौर्य, हिम्मत आणि धाडस फक्त एक स्त्रीच दाखवू शकते! तिच्या उरात देवाची देणगी आहे, खूप साऱ्या प्रेमाचा भांडार आहे..
कधी ती वाहणारी नदी तर कधी एक कोमल फुलाची कळी, गार वाहणारा वारा तर कधी एक आल्हाददायी सुवास, आई बाबा चे एक निरागस स्वप्न, एका पुरुषाच्या आयुष्याची घट्ट बांधलेली गाठ, 9 महिने आपल्या बाळाला पोटात वाढवणारी अजब जादू तर आपल्या नवऱ्याचे प्राण ही देवा कडून खेचून आणणारी शक्ती, माया-प्रेम-काळजी-सहनशिलते ची मूर्ती... सगळे तिचं...!
एक मुलगी, बहिण, मैत्रीण, बायको आणि बाळाची आई बनून माझ्यातल्या स्त्रित्व पूर्ण करण्याची इच्छा असलेली मी एक.. Manali .. आजच्या दिवशी, या स्त्री शक्तीला माझा प्रणाम!
- Manali Kulkarni

Beautifully Articulated!!!!
ReplyDeleteThanks Sachin :)
ReplyDelete