Thursday, December 29, 2011

किंमत

एखाद्या व्यक्तीची खरी किंमत कळायची असेल,
तर त्या व्यक्तीने आपल्या पासून दूर गेलेचं पाहिजे का,
दिवसातला एक एक सेकंद मोजायला लागतो आपण,
मगच आपले खरे प्रेम आपल्या लक्षात येत का,

अगदी .. काल परवा पर्यंत मी ही तशी ठीकच होते,
आयुष्य येईल तसं जगायचे, या तत्वानुसार वागत होते,
सगळे काही आपली मनासारखे आहे, असा विश्वास जरा कुठे वाटायला लागला,
आणि ज्या व्यक्तीची आयुष्यात सर्वात जास्त सोबत होती, तोचं माझापासून दुरावला,

बरोबर असताना घालवलेले सगळे क्षण मग 
एक एक करून डोळ्यासमोर उभे राहू लागले,
आणि त्याचा आठवणी मध्ये गुरफटलेले माझे मन,
सैरभर त्याचा मागे धावू लागले,

त्या व्यक्तीची खरी किंमत कळायला मला त्याला गमवावे लागले,
आणि आयुष्यात नक्की मला काय हवंय, या प्रश्नाचे उत्तर आजही अनुत्तरीत राहिले,

माझ्या विचारामध्ये अशीच हरवून गेलेली असताना,
कोण कुठल्या फोन कॉल ने मला स्वप्नातून हलवले,
मी
पाहिले, मी पाहिले तर तो त्याचाच फोन होता,

आनंदाने वेडी पिशी होऊन मी फोन उचलला, 
पण नेमका त्याच वेळेस माझ्या शब्दाने माझा साथ सोडला,
संभाषणाची तशी गरज आम्हाला कधी पडलीच नव्हती,
कारण, एकमेकांचा अबोला ही ओळखण्याची जादू आमच्या नात्यात पहिल्या पासूनच होती,

एकमेकाशी काही ही न बोलता आम्ही एकमेकांना सर्व काही सांगितले,
त्या फोन वर एक शब्द ही न बोलता मी माझे सगळे मन त्याचा समोर उलगडले,
डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंना मात्र त्या वेळी सावरणे कठीण होते,
त्याच्या शिवाय मी कशी काय राहिले, हेच फक्त त्यातून व्यक्त होत होते,

माझे अश्रू आणि अबोल्याने त्याला माझी सगळी स्थिती सांगितली होती,
कारण, आज मला त्याचा असण्या आणि नसण्याची खरी किंमत कळून चुकली होती ...! 

No comments:

Post a Comment

About Me

My photo
Nasik-Pune-Mumbai, Maharashtra, India
HR at profession, scorpion, independent, cricket fan, BB lover, dancer, tea addict, shopping freak, talkative..!