माणूस आणि शिक्षा याचे किती जवळ चे नाते असते, नाही का?
आपण लहान असताना शाळेत जात नाही म्हणून शिक्षा,
शाळेत गेल्या वर अभ्यास केला नाही म्हणून शिक्षा,
अभ्यास करूनही चांगले मार्क्स मिळाले नाहीत म्हणून शिक्षा,
तर शेजारच्या जोशी काकूच्या मुली सारखी badminton मध्ये 1st price मिळवले नाही म्हणून शिक्षा!
जसं जसं मोठे होत जातो, या शिक्षेच रूप बदलत जाते,
अभ्यास, मार्क्स, sports या छोट्या छोट्या गोष्टी मधून बाहेर येऊन
आपले आयुष्य आपल्या मोठ मोठे अनुभव आणि शिक्षा सुनावत जाते,
इथे प्रत्येकाच्या शिक्षेचा अनुभव वेगळा आणि त्यावर react होण्याची पद्धत ही . .
एखाद्यासाठी आपले सर्वस्व देऊन हि आपल्या पदरी काहीचं पडत नाही
हे दुःख आणि ही शिक्षा मला सर्वात मोठी वाटते,
आपण आपल्याला शक्य होते ते सर्व काही करून ही,
पदरी आलेली निराशा जीवघेणी ठरत जाते,
आपला श्वास ही दुसऱ्याच्या नावा वर करून आपलाच जीव गुदमरतो,
ही वेदना त्या एवढ्याश्या मनाला, त्या जीवाला असह्य होते,
आणि मग आपण कुठे चुकलो, कुठे कमी पडलो,
या असल्या प्रश्नाच्या गुंत्यामध्ये आपले दुःखी मन अडकून राहते,
आपण सद्भावनेने काही करायला जातो, कधी काही सांगतो तर लपवतो,
कारण आपल्या साठी महत्वाचे असते ते म्हणजे समोरच्या व्यक्तीचे मन,
त्या जीवलगाच्या भावना, त्याचे होकार- नकार आणि त्याच्या इच्छा- आकांक्षा,
परंतु, आपण असे का केले, या मागचे कुठले ही कारण जाणून न घेता,
आपल्या पदरी फक्त वाईटपणा येतो,
अर्थातच, आपण गुन्हेगार म्हणून जाहीर केले जातो आणि मग .. तो एकाकीपणा, तो अबोला, ते आरोप.. आणि पुन्हा एकदा मिळते ती 'शिक्षा'!
- Manali Kulkarni

No comments:
Post a Comment