२०१२ मधला आज -- सगळे काही रोज चा रोज चालू असते.. प्रत्येकजण आपल्या आयुष्यात, आपल्या गुंतागुंती मध्ये अडकलेला असतो.. मग या 'so called busy life' मध्ये एखादे email, SMS आला की एकदम मस्त वाटते, वाढदिवसाला phone calls, new year, diwali ला messages हे सगळे आज routine झाले आहे! सगळे जण या साठी OK आहेत. थोडक्यात, आपल्या रोज चा कटकटी मध्ये कोणालाच वेळ नाहीये एकमेकांसाठी.. बस आहेत तर 'excuses'... busy असल्याची, office मध्ये कामा चे pressures असल्याची, तब्बेत बरी नसल्याची, काय करू ग आज काल वेळच मिळत नाही, दिवस कसा येतो आणि जातो कळतच नाही मला.. बघ ना .... ही असली वाक्य आपल्याला नेहेमी ऐकायला मिळतात.. आपण ही खूप मोठ्या मनाने ते समजून घेऊन "Its okay yaar, I can understand, माझे ही same life चालूये" असं म्हणून त्या कारणांना पाठींबा देतो.. कुठे तरी आपण ही असेच वागतो ही जाणीव, ही भीती, हे दुख प्रत्येकाला मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात असतच कदाचित!
परिवार, नाती गोती.. आपली माणसे आणि त्यांच्या साठी वाटणारा तो जिव्हाळा नाहीये असं मी म्हणत नाही. पण त्या रोजचा busy life मध्ये तो जिव्हाळा हरवलाय, ते प्रेम कुठे तरी जाऊन अडकलंय, कमी पडतंय.. आजच्या MNC मधल्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या, लाखो रुपयांचे गाडी बंगले, weekend planning या सगळ्या मध्ये आपण काही तरी विसरतोय, काही तरी रोज च्या रोज हरवतोय हे आपल्या लक्षात ही येत नाही..
तसं पाहायल गेले तर मी ही याचं 2012 मधली एक मुलगी.. या सगळ्या पेक्षा काही खूप वेगळी नाहीये माझी कथा .. पण एवढ्यातच आमच्या घरी एक प्रसंग घडला आणि मग हळू हळू या सगळ्या गोष्टी, या मागचे प्रोब्लेम्स माझ्या लक्षात येऊ लागले.. आमचे सगळ्यात मोठे बंधुराज, त्यांच्या परिवार सहित, म्हणजे त्याची बायको आणि मुलगी - office च्या कामा निम्मित ३ वर्षां करिता Germany ला shift झाले.. आमचा दादा जाणार आहे, हे आम्हा सगळ्यांना किमान ६ महिन्यांपासून माहिती होते, कुठे तरी २ दिवस छान निवांत जाऊयात, एक मस्त family get together करूयात, अस 50 वेळा बोलले गेले, पण as I said, 'so called busy life' मध्ये कोणालाच ते जमले नाही.. आणि मग त्यांची जायची वेळ आली तेव्हा त्या शेवटच्या आठवड्यामध्ये या सगळ्या गोष्टी realize होऊ लागल्या.. आपल्या अत्यंत जवळचे माणूस आपल्या पासून खूप दूर जातंय, हे जस जस जाणवायला लागले, तसा तसा अधिकच त्रास होऊ लागला. त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी सगळेच प्रार्थना करते होते, पण मनातल्या मनात प्रत्येकाला ते आपल्या पासून दूर जाता आहेत हे सलत होते.. मग तो दिवस आला, सामानाची बांधाबांध झाली, मित्र आप्तेष्ट नातेवाईक यांच्या गाठी भेटी झाल्या.. airport पर्यंत सोडायला गेलो, bye, will miss you, stay in touch, internet, phone calls etc etc असे सगळे promises करत त्यांचा निरोप घेतला.. पाणावलेले डोळे आणि मनात त्यांच्या आठवणी घेऊन आम्ही घरी परतलो..
मग अचानक Gmail, Facebook, Whatsapp हे सगळे खूप महत्वाचे वाटायला लागले.. एका सकाळी तर चक्क हातामधले काम सोडून मी 'Viber' download करायला घेतले.. . आपण एकमेकेना किती miss करतोय, हे दाखवण्याचे आटोकाट प्रयत्न चालू होते.. शांतपणे बसून या सगळ्याचा विचार केला आणि स्वताच्या मूर्खपणावर मला स्वतालाच हसू आले .. आज ते दूर गेले मग अचानक पणे connectivity इतकी गरजेची का भासू लागली? हाकेच्या अंतरावर राहत होतो, तेव्हा ही माया कुठे गेली होती? एखाद्या व्यक्तीची खरी किंमत कळायची असेल, तर त्या व्यक्तीने आपल्या पासून दूर गेलेचं पाहिजे का? असे प्रश्न दिवसभर माझ्या मनाला सतावत होते..
खर उत्तर मिळालाय की नाही, हे पक्कं नाही सांगता येणार.. पण एवढे नक्की सांगेन की आज मध्ये जगा, वर्तमान खूप सुंदर आहे, तो तुमचा आहे आणि अर्थातच तुमच्या हातात आहे.. जे होऊन गेले ते नक्कीच बदलता येणार नाही आणि पुढे काय होणार हे नियतीने अजून सांगितले नाही.. मग आज आपल्या आयुष्यातून वेळ काढून दुसऱ्यांसाठी जगा.. ज्यांच्या वर मनापासून प्रेम करता त्यांना नक्की सांगा, एखाद्या संध्याकाळी आपल्या जिवलगाला सहजच काहीही कारण नसताना भेटायला जा, तुझी आठवण आली मग आले तुला भेटायला, अस म्हणून तर बघा .. त्या व्यक्तीच्या डोळ्यात दिसणारा आनंद तुम्हाला जगात कुठेच सापडणार नाही... कधी तरी एखादे गाणे गुणगुणा ज्याने तुम्हाला आनंद मिळेल, चांगले पुस्तक वाचा, तुमची विचारसरणी बदलण्यासाठी ते नक्कीच मदत करेल, college च्या कट्ट्या वर कधी तरी जाऊन बसा, तो wada paav पुन्हा खा, तो cutting चहा पुन्हा order करा.. पहिल्या पाऊसात bike वर बाहेर पडा, कोणालातरी रात्री 12 वाजता birthday cake घेऊन घरी जाऊन wish करा.. माझे आयुष्य तुझ्याविना शक्य नाही, हे त्या एका व्यक्तीला दिवसातून एकदा तरी सांगा ज्यावर तुम्ही स्वताहून जास्ती प्रेम करता, आई बाबा ना picture ची surprise tickets काढून द्या, तुमच्या friends चा party मध्ये उगाच एक दिवस त्यानाही involve करा.. रात्री झोपताना त्या परमेश्वराचे आभार माना, उद्याचा दिवस आज पेक्षा ही चांगला जाऊ देत ही अपेक्षा परत मस्त झोपी जा..
आज जे आहे त्याची किंमत करा, हे तेच आहे जे तुम्ही कधी काळी देवा कडे मागितले होते, हे तेच आयुष्य आहे ज्याची आज कोणीतरी जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात प्रार्थना करतय.. तुम्ही unique आहात, हे आयुष्य पुन्हा मिळणार नाही, निघून गेलेली व्यक्ती तुमच्याकडे परतणार नाही याची जाणीव ठेवा. जे देवाने दिलंय ते हसत हसत स्वीकारा, भरपूर खा प्या, मोकळेपणाने खदखदून हसा, मन भरून जगा..
आयुष्य खूप सुंदर आहेच ते अजून सुंदर बनवा.. !
- Manali Kulkarni

No comments:
Post a Comment