आज कित्ती कित्ती वर्षांनी एक गांडूळ कागदावर उचलून बाहेर टाकलं, अन् असंच विचारात पडलो...
गेल्या कितीक वर्षात पापडाच्या बोट्या खाल्ल्या नाहीत, आखीव ताव विकत आणले नाहीत, मुंगीकडे निरखून पाहिलं नाही. पेनात शाई भरली नाही. गाण्याच्या भेंड्या खेळल्या नाहीत. आवाज आल्यावर डोक्यावरच विमान दिसेनासं होईपर्यंत अगदी मान दुखेपर्यंत पाहिलं नाही. कॉईन बॉक्स वरून फोन केला नाही. फटाक्याची माळ सुट्टी करून पेटवली नाही. चुलीवर पाणी तापवलं नाही. अंगणातलं गवत काढलं नाही. चप्पल तुटल्यावर लंगडत जाऊन शिवून घेतली नाही. नाटकाचे पडदे रंगवले नाहीत. चॉकलेटचा सोनेरी कागद सरळ चपटा केला नाही. रस्त्यावरचं प्लास्टीकचं डबड पायानं लाथाडत चाललो नाही.....
आता या सगळ्या गोष्टीत काही अवर्णनीय आनंद होता आणि हे सगळं करत नाहीये म्हणजे आयुष्य खूप निरस, केवीलवाण चाललंय असही नाही.
मी रूढार्थाने नोस्टॅल्जिक वगैरे होणाऱ्यातलाही नाही. पण तरीही नकळत जमाखर्च मांडला जातोच ना .
काळानं जे आणि जेवढं दोन्ही हातांनी ओरबाडून नेलंय तितकं खरंच परत दिलंय का? मुठभर तरी ....Disclaimer: This is not my work. But I have read this and thought of sharing it with you.

अगदी खर आहे ... काळाबरोबर जाताना किती आपण मागे टाकले आहे .. आणि काय काय हरवले आहे ... काळातच नाही .. मागचे असे आठवल्याशिवाय ....
ReplyDeletehmm .. खरंय !!!
ReplyDelete