Tuesday, August 2, 2011

का बरे मी प्रेमात पडले, असा प्रश्नच मुळी मला पडत नाही,
तू असलास काय, नसलास काय, माझं काहीच अडत नाही

समोर असलास की डोळे भरून बघून घेते तुला,
नसलास
की तुझ्या आठवणीत जगून घेते तुला,
असण्या-नसण्याच्या सीमांच्या व्याख्येत माझं प्रेमच बसत नाही,
तू असलास काय, नसलास काय, माझं काहीच अडत नाही

आजही रोज संध्याकाळी नकळत तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसते,
कधीतर चक्क आपल्या नेहमीच्या ठिकाणीही जाऊन बसते,
माझ्या वागण्याचे कधी मलाच संदर्भ लागत नाहीत,
तू असलास काय, नसलास काय, माझं काहीच अडत नाही

तू येणार नाहीस हे माहीत असतं मला, तरीही वाटतं,
येशीलच ऐकून माझी अधीर साद...
चंद्र-चांदण्यांतही असतील ना रे काही वाद,
पण तरीही चंद्र आकाशात आला, की चांदणंही आल्याशिवाय राहत नाही,
तू असलास काय, नसलास काय, माझं काहीच अडत नाही

शिकलेय मी आता तुझ्यावाचून जगणं,
तुझ्या भासांच्या जाळ्यात स्वतःला गुरफटून टाकणं,
आता कधी मला तुझं नसणं सलत नाही,
कारण तेव्हा जणु माझीचं मी उरत नाही,

का बरे मी प्रेमात पडले, असा प्रश्नच मुळी मला पडत नाही,
तू असलास काय, नसलास काय, माझं काहीच अडत नाही

1 comment:

About Me

My photo
Nasik-Pune-Mumbai, Maharashtra, India
HR at profession, scorpion, independent, cricket fan, BB lover, dancer, tea addict, shopping freak, talkative..!