Thursday, July 7, 2011

रस्त्यावरून जाता जाता ,कधीतरी एक call आला

‘Mum’ Calling असं झळकावून मग ,माझा phone वाजू लागला

हो ,अगं just पोचतो ,हा jam फार irritate करतोय

आज traffic बघ ना ,snail’s pace नि पुढे सारतोय



Phone ठेवला ,brake सोडले ,गाडी चे चाक जरासे पुढे सरले

मन मात्र मागे आले , दोन मिनटा पूर्वीच्या बोलण्यात दडले

कसं आरामात भाषांतर झालं ,

वैतागचा ‘irritate’ झालं

आणिहळू हळू चा ‘snails pace’ झालं

मग आपणहूनच मन माझं ,जेभेवर्ती मागे गेलं.



अर्रे बापरे कधी ‘Oh Fuck’ झालं ,ते कानालाही कळला नाही

जीभ भाषेशी घात करताना ,मनाला काहीच भिडलं नाही

रस्त्यावरचे लोक आताअरे मित्रा सोडून भैय्या होते

मैत्रिणीचे नाव सुधाजयु सोडून “Jazz” होते .



प्रेमाला तर कधीच ‘love’ नि मागे टाकलं होतं

मराठीत प्रेम व्यक्त करणं ,बर्याच आधी expire झालं होतं

इतर भाषांची चाकरी जणू मनात ऋत्लीच होती

जेभेवरची मातृभाषा आता जशी सावत्रच वाटत होती



इतक्यात steering वरच्या हाताला टोकदार काहीतरी जाणवलं

आई चा घो !म्हणत मी हात मागे खेचला

काटा रुतला होता हातात ,टिपूस भर रक्त निघालं होतं

मन मात्र खुश होतं ,ते रक्त माझं मराठीत वाहिल होतं ..

No comments:

Post a Comment

About Me

My photo
Nasik-Pune-Mumbai, Maharashtra, India
HR at profession, scorpion, independent, cricket fan, BB lover, dancer, tea addict, shopping freak, talkative..!